मुंबई - बॉलिवूड अभिनेता अरबाज खानचा मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर जॉर्जिया अँन्ड्रॉनी हिच्याशी नाव जोडले गेले आहे. बऱ्याच काळापासून त्या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा सुरु आहेत. अनेकदा दोघेही वेगवेगळे कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्याच्या चर्चा बहरल्या आहेत. अशातच अरबाज खानने जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती 'मेरे रश्के कमर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
अरबाज खान आणि जॉर्जियाचे बरेचसे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अरबाजने शेअर केलेल्या या व्हिडिओची बरीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करून अरबाजने त्यावर खास कॅप्शनही दिले आहे. 'माझ्या आवडत्या गाण्याला माझ्या पद्धतीने अभिवादन करतोय', असे त्याने यामध्ये म्हटले आहे.
अरबाज खान आणि मलायका अरोरा हे एकेकाळचे लोकप्रिय कपल मानले जात होते. मात्र, काही कारणास्तव त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या मलायकाचेही नाव अर्जुन कपूरसोबत जोडले जात आहे. तर, अरबाजही जॉर्जियासोबत लवकरच लग्न करणार असल्याचेही बोलले जाते.
एका माध्यमाशी बोलताना जॉर्जियासोबत असलेल्या रिलेशनशीपबाबत तो म्हणाला होता, की 'जर माझे कोणाशी अफेअर असले, तर मी ते कधीच लपवणार नाही. मी उघडपणे सांगतो, की जॉर्जिया माझी चांगली मैत्रीण आहे. सध्याच्या घडीला तिच माझी सोबती आहे. पुढे काय घडेल हे वेळच ठरवेल.'