मुंबई -सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रेहमान यांचे लेखन आणि निर्मिती असलेल्या '९९ साँग्स' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. एक संगीतमय प्रेमकथा असलेला हा चित्रपट देशभरातील सर्व कलाकारांना समर्पित करत ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
विश्वेश क्रिश्नमूर्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातून इहान भट्ट आणि एडिल्से वरगास सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ते 'जय' आणि 'सोफी' हे पात्र साकारत आहेत. ट्रेलरमध्ये नवोदीत गायक आपलं संगीत आणि प्रेयसी यांच्यासाठी संघर्ष करताना दिसतो.
हेही वाचा -चुलबुल्या 'स्वीटी सातारकर'चा धमाल अंदाज, ट्रेलर प्रदर्शित