ए. आर. रेहमान यांची निर्मितीक्षेत्रात एन्ट्री, पहिल्या चित्रपटाची घोषणा - ए. आर. रेहमान
जीओ स्टुडिओसोबत त्यांनी हात मिळवला आहे. लवकरच त्यांचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![ए. आर. रेहमान यांची निर्मितीक्षेत्रात एन्ट्री, पहिल्या चित्रपटाची घोषणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2975963-thumbnail-3x2-rehman.jpg)
मुंबई - संगीतक्षेत्रातील आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या गाण्यांनी आजवर नवनवे इतिहास निर्माण केले आहेत. संगीतक्षेत्रातील एक उत्तुंग नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरुणाईसह सर्वच वर्गातील श्रोत्यांवर त्यांच्या गाण्यांची भूरळ पडते. बॉलिवूडसह इतरही सिनेसृष्टीत त्यांनी आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. आता त्यांनी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. जीओ स्टुडिओसोबत त्यांनी हात मिळवला आहे. लवकरच त्यांचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'९९ साँग्स' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे. या चित्रपटाची कथादेखील ए. आर. रेहमान यांचीच आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.