महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडल्यावर पहिला सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तो म्हणजे ‘जयंती’ (‘Jayanti’ Marathi movie). अत्यंत वास्तविक कथानक आणि दमदार अभिनयामुळे या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली. चित्रपटाच्या निर्मात्यांचे मराठी चित्रपट वर्तुळातून कौतुक होत आहे कारण अनिश्चिततेच्या काळात त्यांनी आपला सिनेमा थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्याचं धाडस केलं. ही मराठी चित्रपट पुन्हा नव्याने उभे राहण्याची नांदी समजली जातेय. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटाने माहिती सिनेसृष्टीत पुनःश्च हरिओम केला आहे. करमणुकीच्या माध्यमातून सामाजिक विषयाला हात घातलेल्या जयंती (Jayanti) या सिनेमाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या चित्रपटाचे प्रेक्षकच नव्हे तर आता चक्क मराठी चित्रपटसृष्टीही तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.
जयंती या चित्रपटाचे पोस्टर (Poster of 'Jayanti' movie) जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हापासूनच या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. काही कालावधीनंतर चित्रपटाची गाणी तसेच ट्रेलर सोशल मीडियाद्वारे जारी करण्यात आला आणि लोकांच्या उत्सुकता अधिकच वाढल्या. चित्रपट प्रदर्शनाच्या अगदीच एक दिवस आधी सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी जयंती सिनेमाचा ट्रेलर शेयर करत संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळत मराठी सिनेरसिकांनी चित्रपटगृहात गर्दी करत चित्रपटाप्रती प्रेम व्यक्त केले आहे. हे इथपर्यंत थांबले नसून आता मराठी सिने सृष्टीतील नामवंत व्यक्तींकडून देखील जयंतीची दखल घेताना दिसत आहे.