मुंबई - अभिनेता अपारशक्ती खुराना आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. सहाय्यक अभिनेता म्हणून त्याची बरीच लोकप्रियता आहे. आता आगामी 'हेलमेट' या चित्रपटातून तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रनुतन बेहलचीही भूमिका पाहायला मिळणार आहे.
प्रनुतन बेहलने 'नोटबुक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं. आता अपारशक्तीसोबत ती 'हेलमेट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -लायन्स गोल्ड अवार्ड्स २०२० : पाहा बॉलिवूड कलाकारांचा स्टायलिश अंदाज
अलिकडेच 'हेलमेट' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. डीनो मोरिया प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रॅप अप पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.