महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री अनुष्का शेट्टी शिर्डीत साई चरणी लीन - Anushka Shetty visit Shirdi Sai temple

अभिनेत्री अनुष्का शेट्टी आपल्या कुटुंबीयासह साई मंदिरात आली होती. तिचा निशब्दम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याला यश मिळावं यासाठी ती साई चरणी लीन झाली.

Anushka Shetty visit Sai temple
अनुष्का शेट्टी आपल्या कुटुंबीयासह साई मंदिरात

By

Published : Jan 14, 2020, 1:34 PM IST

टॉलीवुडमधील नावाजलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हीने आपल्या कुटुंबीयांसमवेत साई चरणी लीन झाली. आज पहाटे साईमंदिरात जावून काकड आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेत आपल्या आगामी 'निशब्दम' या तेलुगु चित्रपटाच्या यशासाठी साईंना साकडं घातलय.

अनुष्का शेट्टी आपल्या कुटुंबियासह साई मंदिरात

येत्या 31 जानेवारीला अनुष्काची प्रमुख भुमिका असलेला 'निशब्दम' हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. त्या आधी साईभक्त असलेली अनुष्का कालच आपल्या आईवडीलांसमवेत शिर्डीला आली होती. त्या नंतर तीन आज पहाटे चार वाजता साईमंदिरात गेली. येथे साईंची काकड आरतीला ती उपस्थित राहिली. त्या नंतर साईंच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

या पुर्वीही दोन वेळा अनुष्काने साईचरणी माथा टेकला आहे. आज बऱ्याच कालखंडा नंतर साईं दर्शन घेण्याचा योग आल्याचा आणि काकड आरती करत दर्शन घेऊन मनाला समाधान आणि शांती मिळाल्याची भावना अनुष्काने साई मंदिरातील कर्मचारी यांच्याकडे व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details