मुंबई - अभिनेत्री अनुष्का शेट्टी आगामी 'निशब्दम' या चित्रपटात झळकणार आहे. आर. माधवनसोबत तिची जोडी असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. या चित्रपटात ती एका पेटींग कलाकाराची भूमिका साकारत आहे.
पोस्टरवर अनुष्का हातात ब्रश घेऊन नदी किनारी कॅनव्हासवर चित्र रेखटताना दिसत आहे. शहरालगतची नदी किनारी हिरवळीवर ती आपली कलाकृती बनवताना पोस्टरध्ये दिसत आहे. तिच्यासाठी हा चित्रपट खास असून २०१९ मध्ये ती अभिनयाच्या क्षेत्रात १४ वर्षे कार्यरत आहे.