मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सीदरम्यान आणखी एक फोटो शेअर केला आहे. सोनेरी उन्हात क्लिक केलेल्या या फोटोत तिची चमक दिसून येत आहे. हा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती एक सुंदर पांढरा टी-शर्ट, पीच कलर डंगरी आणि क्लासिक व्हाईट स्नीकर्समध्ये सुंदर दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, “पॉकेटफुल ऑफ सनशाईन”
अनुष्का सध्या सौदी अरेबियात आपला पती विराट कोहलीसोबत सुट्टीचा घालवत आहे. इंडियन प्रीमियर लीगचा या वर्षीचा हंगाम युएईमध्ये खेळला जात आहे.
पुढच्या वर्षी जानेवारीत विराट आणि अनुष्का आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करतील. ऑगस्टमध्ये त्यांनी ही गोड बातमी शेअर करीत लिहिले होते, "आता आम्ही तीनजण झालो आहोत! जानेवारी २०२१मध्ये तो येथे येणार आहे."
या सेलिब्रिटी जोडप्याने डिसेंबर २०१७मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते.