मुंबई -अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी कला आणि क्रिकेट विश्व दोन्हीही क्षेत्रात लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असतात. अलिकडेच विराटने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अनुष्काने काढला आहे. या फोटोमध्ये तिने विराटच्या चेहऱ्यावरचे हावभाव टीपले आहेत.
विराटने हा फोटो शेअर केल्यानंतर या फोटोवर ४ लाखापेक्षा जास्त लाईक्स आणि ५ हजारापेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत. या फोटोवर अनुष्काने हार्टी इमोजी असलेली कमेंटही दिली आहे.
हेही वाचा-बॉलिवूडच्या 'या' खतरनाक व्हिलनच्या मुलगा करणार बॉलिवूड डेब्यू, पाहा फोटो
विराट आणि अनुष्का दोघांचाही एक फोटोदेखील अलिकडेच चर्चेचा विषय बनला होता. विराटनेच हा फोटो शेअर केला होता. यामध्ये दोघांचाही हॉट अंदाज पाहायला मिळाला. तर, अनुष्कानेही तिचे समुद्रकिनाऱ्यावरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटोदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तिच्या बालपणीच्या फोटोंनाही चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया मिळाल्या.
हेही वाचा-'सैरा नरसिम्हा रेड्डी'चं मोशन पोस्टर, ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज