मुंबई - अलिकडेच ट्रेंड झालेल्या #anuragkashyapisis_terrorist याला उत्तर देण्यासाठी अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ त्याच्या चाहत्यांनी #istandwithanuragkashyap हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. इंटरनेट युजर्सनी जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होत कश्यप यांचे कौतुक केले आहे.
मंगळवारी सकाळी अनुराग कश्यप यांच्या चाहत्यांचे ट्विट हॅशटॅग #istandwithanuragkashyap यांनी भरलेले होते.
सोमवारी मुंबईतील आंदोलनाचे फोटो शेअर करीत एका युजरने ट्विटमध्ये लिहिलंय, ''हे बॉलिवूडचे असली हिरो आहेत. यांच्याकडे तथाकथित अॅक्टर्सच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फालतूपणाशी मुकाबला करण्याचे साहस आहे....#istandwithanuragkashyap.'' या आंदोलनात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींसह अनुराग कश्यप हजर होता. या सर्व प्रतिक्रिया ट्विटरवर फोटोसह शेअर करीत एका चाहत्याने लिहिलंय, ''बॉलिवूड सेलेब्रिटींच्या वतीने पहिले पाऊल...आम्ही तुमच्या हिंमतीला सलाम करतो.''
अनुराग कश्यप यांच्या २०१२ मध्ये गाजलेल्या 'गँग्ज ऑफ वासेपूर' चित्रपटातील लोकप्रिय 'कह के लुंगा' चा उल्लेख करीत ट्विट केलंय, ''मी अनुराग कश्यपच्या सोबत आहे...कारण कोणीतरी आहे जे फॅसिस्टवादाच्या विरोधात आपला आवाज उठवतंय. 'गँग्ज ऑफ वासेपूर'चे गाणे 'कह के लुंगा' आठवणीत आहे. ते आता हेच करीत आहेत.''
#anuragkashyapisis_terrorist या हॅशटॅगने आवाज तयार केलाय. सोशल मीडियावरील युजरनी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात टीका केली आहे. प्रसिध्दीसाठी हे अनुराग कश्यप करीत असल्याचेही म्हटले आहे.