मुंबई - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. तो स्वतःला रामभक्त म्हणतो. दिल्लीच्या जेवर परिसरातील तो रहिवासी आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत कलाविश्वातील कलाकारांनीही संताप व्यक्त केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही या घटनेसंबधी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्याने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
जामिया येथे झालेल्या गोळीबारावर अनुरागने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की 'जय श्रीराम व भारत माता की जय म्हणा आणि हिंदूत्वाच्या नावाखाली काहीही करा. तुम्हाला थांबवणारं कोणी नाही. कारण, आता असा संशय येतोय की सरकारच दहशदवादाला पाठिंबा देत आहे'.