मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. मात्र, काही दिवसांपासून त्याच्या अकाऊंटवर त्याच्या मुलीबाबत धमकीवजा संदेश येऊ लागले. तसंच त्यालाही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कंटाळून अखेर अनुरागने ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे.
ट्विटरवर मिळणाऱ्या धमक्या पाहून अखेर अनुरागनं डिलीट केलं अकाऊंट - बॉलिवूड
काही दिवसांपासून त्याच्या अकाऊंटवर त्याच्या मुलीबाबत धमकीवजा संदेश येऊ लागले. तसंच त्यालाही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कंटाळून अखेर अनुरागने ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे.
ट्विटरवर मिळणाऱ्या धमक्या पाहून अखेर अनुरागनं डिलीट केलं अकाऊंट
अनुरागने अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी शेवटचे दोन ट्विटस केली आहेत. ज्यावेळी तुमच्या आई-वडिलांना धमकीचे फोन आणि मुलीला धमकी देणारे संदेश येतात, त्यावेळी कोणीही यावर उघडपणे बोलायला तयार नसतात. अशा नव्या भारताच्या तुम्हाला शुभेच्छा', असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'मला निर्भीडपणे माझे विचार मांडता येत नसतील तर, मी यावर काहीच बोलणार नाही. गुड बाय', असंही ट्विट करुन त्याने आपले ट्विटर अकाऊंट कायमचे बंद केले आहे.
Last Updated : Aug 11, 2019, 2:30 PM IST