मुंबई -अक्षय कुमारच्या नागरिकत्वाबाबत सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अक्षय कुमार भारतीय नाही, तर कॅनेडीयन आहे. मग त्याला राष्ट्रीय पुरस्कार कसा देण्यात आला, असे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व चर्चांवर अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून नेटकऱ्यांना स्पष्ट उत्तरही दिले होते. तरीही त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरून सोशल मीडियामध्ये वादंग सुरूच आहे. त्यामुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर हे अक्षयच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ट्विटरद्वारे त्यांनी अक्षयला पाठिंबा दिला आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे, की 'बऱ्याच दिवसांपासून मी तुझ्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरून पेटलेले वाद वाचत आहे. तुझे देशावर प्रेम आहे, हे सिद्ध करण्याची तुला गरजच नाही. तू खरा योद्धा आहेस. कोणालाही काहीही समजावून सांगण्याची गरज नाही'.