मुंबई -बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे चाहत्यांवर राज्य केले. सिनेसृष्टीत त्यांचे अनमोल असे योगदान आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्यासोबत 'कर्मा' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान दिलीप कुमार यांच्यासोबतचा अनुभव त्यांनी एका पोस्टद्वारे शेअर केला आहे.
अनुपम खेर यांनी दिला दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा, शेअर केला 'हा' फोटो - jacky shroff
१९८६ साली 'कर्मा' चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अनुपम खेर यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. तर, दिलीप कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
१९८६ साली 'कर्मा' चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अनुपम खेर यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. तर, दिलीप कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत एक फोटो शेअर करताना अनुपम यांनी लिहिलेय, की 'सुभाष घईचे दिग्दर्शनाखाली माझी ही पहिलीच भूमिका होती. त्यातही मला दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायची होती. त्यामुळे मी नर्व्हस होतो. मात्र, दिलीप कुमार यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवुन मला आधार दिला. शूट संपल्यानंतर त्यांनी मला शाबासकीची थाप दिली तेव्हा मला वाटलं, की मी खरंच चांगलं काम केलं. त्यांच्यासारखा अभिनेता होणे शक्य नाही', असे अनुपम खेर यांनी लिहिले आहे.
'कर्मा' चित्रपटात नुतन, नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, पुनम धिल्लोन, श्रीदेवी आणि दारा सिंग हे कलाकारही झळकले होते. ८ ऑगस्ट १९८६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.