मुंबई -'बिग बॉस'च्या १२ व्या पर्वात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी जोडी अनुप जलोटा आणि जसलिन मथारू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या दोघांच्या रोमान्सच्या चर्चांनी बिग बॉसचे १२ वे पर्व खूप गाजले होते. याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. गुरू शिष्याची जोडी लव्ह जोडीमध्ये जमल्यानंतर त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र झळकणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अनुप जलोटा आणि जसलिन 'वो मेरी स्टूडंट है' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटात अनुप जलोटा हे गायकाची भूमिका साकारणार आहेत. तर, जसलिन ही त्यांच्या विद्यार्थिनीच्या रुपात दिसणार आहे. खऱ्या आयुष्यातील गुरू-शिष्याची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रिल लाईफमध्येही ही भूमिका साकारणार आहेत.
हेही वाचा- 'भूतराजा' बनून नवाजुद्दीनने केले अक्षयला बेहाल, पाहा 'हाऊसफुल ४'चं धमाल गाणं