मुंबई - दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपला ट्विटर फोटो बदलल्यानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हाने त्याच्यावर टीका केली आहे. अनुरागने मोदी आणि शाह यांचा मास्क बांधलेला आणि हातात काठी घेतलेला स्केच फोटो लावला आहे.
अनुभव सिन्हाने हा फोटो शेअर करीत लिहिलंय, ''अनुराग कश्यप मी हा फोटो डीपी म्हणून लावण्यावर आक्षेप घेत आहे. याची अनुमती तुम्हाला बिल्कुल नाही.''
सोशल मीडियावर अनुभव सिन्हांच्या या कॉमेंट्सवर भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युजरने लिहिलंय, ''कपड्यावरुन यांची ओळख होऊ शकत नाही.''
दुसऱ्या ट्विटरने लिहिलंय, ''हे एकसारखे वाटत आहेत.''
अलिकडेच जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांना अज्ञात गुंडांनी तोंडावर रुमाल बांधून जबर हल्ला केला होता. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थींनीच्या वस्तीगृहात घुसून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असून बॉलिवूडमधील अनेकांनी या हल्ल्याचा निषेध करीत घटनेचा केला आहे.