मुंबई -म्यूझिक कंपोजर अनु मलिक यांच्यावर मागच्या वर्षी गायिका सोना मोहापात्राने #MeToo च्या चळवळीतून लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लावले होते. तेव्हापासून अनु मलिक हे चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा सोनाने त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा त्यांना इंडियन आयडॉलच्या परीक्षकाचे पद सोडावे लागले आहे.
अनु मलिक हे इंडियन आयडॉलच्या अकराव्या पर्वाचे परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्यासोबत गायिका नेहा कक्कर आणि विशाल दादलानी हे देखील परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. मात्र, मागच्या वर्षीपासून #MeeToo मध्ये अनु मलिक यांचे नाव अडकल्यामुळे त्यांना मागच्या वर्षीदेखील या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
हेही वाचा -रानू यांच्या व्हायरल फोटोमागे हे आहे सत्य, मेकअप आर्टिस्टने केला खुलासा