चंदीगढ -अभिनेत्री रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंगविरोधात ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली पंजाबच्या अमृतसर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. आता कॅथलिक चर्चचे सदस्य सुखजिंदर गिल यांनीदेखील चंदीगढमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ख्रिसमसच्या दिवशी एका टीव्ही कार्यक्रमात भारती, रवीना टंडन आणि फराह खान यांनी ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावतील असे शब्द उच्चारले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात पंजाबच्या बऱ्याच भागात शांतीपूर्वक विरोध दर्शविण्यात आला. जालंधर आणि गुरदासपूर येथेदेखील विरोध दर्शविण्यात आला.