महाराष्ट्र

maharashtra

'स्ट्रीट डान्सर'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By

Published : Nov 28, 2019, 10:38 AM IST

वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तसेच, डान्स क्षेत्रात पारंगत असलेले कलाकारही यामध्ये झळकणार आहेत.

announcement of Street Dancer Trailer release date
'स्ट्रीट डान्सर'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई -अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य जोडी असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' या चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता आहे. 'एबीसीडी', 'एबीसीडी२' या चित्रपटांचाच हा तिसरा भाग आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांच्या वाढदिवशीच ट्रेलरच्या तारखेची घोषणा करण्यात आली. श्रद्धा आणि वरुणने भूषण यांच्या वाढदिवसाचा केक कापून सेलिब्रेशनही केले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार, असा प्रश्न विचारला. तेव्हा भूषण यांनी या तारखेची घोषणा केली. १२ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -राजकुमारसोबत आयुष्मानचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल


वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तसेच, डान्स क्षेत्रात पारंगत असलेले कलाकारही यामध्ये झळकणार आहेत. रेमो डिसुजा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

२० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details