मुंबई- सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केल्यानंतर २०१८मध्ये लग्नगाठ बांधली. सोनमने तिच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त लग्न आणि हनिमूनच्या आठवणींना उजाळा दिला.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा ८ मे २०१८ ला सोनम आणि आनंदने लग्न केले. दोन वर्षांपूर्वी अनिल कपूर यांच्या घरी सोनमच्या लग्नासाठी बॉलीवूडकर आणि नातेवाईकांचा गोतावळा होता. लग्न, मेहंदी, चूडा सेरेमनी आणि संगीत सोहळा असे विविध कार्यक्रम जवळपास तीन ते चार दिवस चालले होते.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा विवाहस्थळी सोनम कारमध्ये आली होती. तिचा लूक मीडियापासून लपवण्यात आला होता. लाल रंगाचा लेहंगा आणि भरगच्च दागिन्यांमध्ये सजून सोनम अत्यंत सुंदर दिसत होती.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा लग्न झाल्यानंतर बॉलीवूडमधील बहुतेक जोडपी काही पर्सनल वेळ घालवण्यासाठी विदेशात रवाना होत असतात. मात्र सोनम आणि आनंदने लग्नाच्या हँगओव्हरवरुन त्यांचे लक्ष व्यावसायात वळवले.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा लग्नाच्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत सोनम फ्रेंच रिव्हिएरा येथे पती आनंदसोबत पोहोचली. तिथे ती 'कान'च्या रेड कार्पेटवर चालणार होती. सोनम मेंहंदीने भरलेल्या हातांनी कान्स फेस्टीवलच्या कार्पेटवर चालली.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा तेथून परतल्यानंतर ती 'विरे दी वेडींग' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाली. तिला तिच्या निर्णयांसाठी पती आनंद आहुजाने नेहमी पाठिंबा दिला.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा सोनम आणि आनंद त्यांची सर्व कामे आटोपून जून २०१९मध्ये जपानला हनिमूनसाठी गेले. जपानमधील आनंदसोबतचे खूप सारे फोटो सोनमने सोशल मीडियावरून शेअर केले होते.
लग्नाच्या तेरा महिन्यानंतर हनिमूनला गेले होते सोनम कपूर आणि आनंद आहुजा इटीव्ही भारतकडून सोनम आणि आनंदला त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.