मुंबई - 'आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोक फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याच्या प्रवास हा यातूनच पुढे जात असतो’. अशाच कृष्णा सुर्वेची हटके मनोरंजक कथा असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटात बघायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून अभिनेता अंकुश चौधरी बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर झळकणार आहे.
यंदाच्या दिवाळीत अकुशचा 'ट्रीपल सीट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केलं आहे. यामध्ये अंकुश हा 'कृष्णा सुर्वे' ही भूमिका साकारणार आहे. टीजरच्या सुरुवातीलाच अभिनेता अंकुश चौधरी हा हात जोडत मी कृष्णा सुर्वे अशी स्वतःची ओळख करून देतो. आपण आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी असून आपली स्टेअरिंग वरच्याच्या हातात असल्याचे सांगतो.
हेही वाचा -जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगना रनौत 'अशी' करतेय तयारी, पाहा फोटो
तसेच एका अंधाऱ्या खोलीत बसलेली एक तरुणी कृष्णाला कॉल करून मदत करण्याची विनंती करतेय. ही तरुणी नेमकी कोण आहे? आणि कृष्णा तिची मदत करणार का? याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.