महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अंग्रेजी मेडियम' नव्या गाण्यावर थिरकल्या आलिया, कॅटरिना, अनुष्का, जान्हवीसह दिग्गज अभिनेत्री - Angrezi Medium latest news

स्टार स्टडेड 'कुडी नू नाचने दे' या गाण्याने इंटरनेटवर धमाल उडवून दिली आहे. राधिका मदन, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, कियारा अडवाणी आणि अनन्या पांडे या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

Angrezi Medium song:
स्टार स्टडेड 'कुडी नू नाचने दे'

By

Published : Mar 4, 2020, 8:02 PM IST

मुंबई - बहुप्रतीक्षित 'अंग्रेजी मेडियम' चित्रपटातील नवे गाणे 'कुडी नू नाचने दे' रिलीज झाले आहे. प्रत्येकाला ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यात राधिका मदन, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, कियारा अडवाणी आणि अनन्या पांडे अशा दिग्गज तारकांनी ठेका धरलाय.

'कुडी नू नाचने दे' हे गाणे सचिन जिगर आणि विशाल दादलानी यांनी गायले आहे. याचे संगीत सचिन जिगर यांनी दिले आहे.

'अंग्रेजी मेडियम' चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर आला होता. लोकांच्या खूप पसंतीला हा ट्रेलर उतरला असून चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू आहे. दोन वर्षानंतर इरफान खान या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतणार असल्यामुळे प्रेक्षक आतूर झाले आहेत. 'अंग्रेजी मेडियम' हा चित्रपट १३ मार्चला रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details