महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चीनच्या बॉक्स ऑफिसवर आयुष्मानच्या 'अंधाधुन'चे घवघवीत यश, आकडा ३०० कोटी पार

भारतातच नव्हे, तर आता चीनच्या बॉक्स ऑफिसवरही 'अंधाधुन'च्या यशाची घोडदौड सुरुच आहे. चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये 'अंधाधुन'ने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

चीनच्या बॉक्स ऑफिसवर आयुष्मानच्या 'अंधाधुन'चे घवघवीत यश, आकडा ३०० कोटी पार

By

Published : Apr 22, 2019, 11:33 AM IST

मुंबई - मागच्या वर्षी आयुष्मान खुरानाच्या 'अंधाधुन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले. अल्प बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला होता. भारतातच नव्हे, तर आता चीनच्या बॉक्स ऑफिसवरही 'अंधाधुन'च्या यशाची घोडदौड सुरुच आहे. चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये 'अंधाधुन'ने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

आत्तापर्यंत चीनमध्ये 'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बजरंगी भाईजान', 'हिंदी मीडियम' आणि 'हिचकी' हे चित्रपट टॉप पाच क्रमाकांमध्ये होते. यामध्ये 'अंधाधुन' चित्रपटाचाही समावेश झाला होता. 'अंधाधुन'ने सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. आत्तापर्यंत ३०० कोटींची कमाई करत हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'अंधाधुन' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात आयुष्मानने अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. राधिका आपटे आणि तब्बु यांची देखील या चित्रपटात मुख्य भूमिका होती. आयुष्मानच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details