महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनन्या पांडेची बहिण अलांनाला बिकनी घातल्यामुळे गँगरेपची धमकी - अलांनाला गँगरेपची धमकी

अनन्या पांडेची चुलत बहीण व मॉडल अलांना पांडेने तिच्या नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर सायबर-गुंडगिरीविरोधात भूमिका घेतली. ज्यात ती म्हणते की ट्रोल होणे आता तिच्या आयुष्यातील एक "दैनंदिन भाग" बनले आहे. अलांनाने उघडकीस आणले की एका महिलेने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना म्हटले आहे की, तिने बिकीनीमध्ये एक फोटो पोस्ट केल्यामुळे ती गँगरेपसाठी पात्र आहे.

Alanna Panday
अलांना पांडे

By

Published : Jun 10, 2020, 7:39 PM IST

मुंबई: अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण, मॉडेल अलांना यांनी इन्स्टाग्रामवर एक अनोखा खुलासा केला आहे. तिने बिकीनीमधील एक फोटो पोस्ट केला होता. त्याला विरोध करताना एका महिलने म्हटले की, ती गँगरेप करण्यासाठी पात्र आहे.

अ‍ॅलांनाने तिच्या अलीकडील इन्स्टाग्राम पोस्टसह सायबर-गुंडगिरीविरोधात भूमिका घेतली, ज्यामध्ये ती म्हणते की ट्रोल होणे आता तिच्या आयुष्यातील एक "दैनंदिन भाग" बनले आहे.

"हे काही महिन्यांपूर्वी घडले आहे, मी याबद्दल लवकरच बोलेन असे वाटते. परंतु जागृत होणे आणि यासारख्या गोष्टी वाचणे माझ्यासाठी सामान्य झाले आहे, हे माझ्या आयुष्यातील एक दैनंदिन भाग आहे. मी जे रोज वाचते त्यातील हे १ टक्के आहे.'', अशी पोस्ट अलांनाने लिहिली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने इनन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत यात काही फोटो स्विमींगवेअरमधील आहेत.

काही घटना पुढे आणण्यासाठी तिने एक चिठ्ठीदेखील शेअर केली.

"माझ्या पोस्टवर एका महिलेवर भाष्य केले होते. ज्यात तिने मी सामूहिक बलात्कारासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. कारण मी बिकिनीमध्ये एक फोटो पोस्ट केला होता. नंतर तिने माझ्या आईला आणि वडिलांनादेखील ते पाहून खात्री करण्यासाठी कमेंटमध्ये टॅग केले. माझ्याकडे त्याचा स्क्रिनशॉट असता तर बरे झाले असते. कारण मी इन्स्टाग्रामवर ती कॉमेंट वाचून हादरुन गेले आणि ती कॉमेंट डिलीट केली.'', असे तिने पुढे लिहिले आहे.

"जेव्हा मी तिला ब्लॉक करण्यासाठी तिच्या प्रोफाइलला गेले तेव्हा मला दिसले की तिचे लग्न झाले आहे आणि तिला माझ्यापेक्षा लहान मुलगी आहे. दुसर्‍याच्या मुलीबाबत आपण अशी कशी इच्छा बाळगू शकता हे मला समजत नाही."

तिने एका महिलेच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले: "आपल्या देशातील सुशिक्षित महिला अजूनही असेच बोलतात / विचार करतात. तिच्या बायेनुसार ती एकतर डॉक्टर किंवा नर्स आहे."

तिची आई डीअन्नेने देखील याबाबत आपले विचार शेअर केले आहेत.

डीअन्नने लिहिले आहे, "त्याच व्यक्तीने मला असे संदेश पाठवले की, मी माझ्या मुलीला चुकीच्या मार्गाने वाढवत आहे आणि मला लाज वाटली पाहिजे .. तूझ्यावर बॉलिवूडचा प्रभाव आहे म्हणून तू कमी कपडे घालतेस. तुझ्याकडे संपत्ती नाही. त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी तू असे कपडे घालतेस. तिने अशा अनेक ओंगळ कॉमेंट्स तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर केल्या आहे.'',असंही ती म्हणाली.

तिच्या आधीच्या पोस्टमध्ये अलांनाने अंतर्वस्त्रामध्ये स्वत: चा एक फोटो शेअर केला होता आणि लोक तिच्या शरीरावर लाजिरवाणे कॉमेंट्स करीत होते. यालाही अलांनाने सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्या शरीरावर माझे प्रेम आहे आणि मी २०२० मधील स्त्री असल्याने गप्प बसणार नाही असे तिने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details