महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अनन्या' सिनेमाचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री ऋता दुर्गुळे साकारणार 'अनन्या' - 'अनन्या' सिनेमाचा मुहूर्त संपन्न

'अनन्या' या गाजलेल्या नाटकाचे कथानक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळे या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून ऋताचं रूपेरी पडद्यावर पदार्पणही होत आहे. प्रताप फड हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

nanya film shooting start
'अनन्या' सिनेमाचा मुहूर्त संपन्न

By

Published : Jan 14, 2020, 2:40 PM IST

मराठी रंगभूमीवर गाजलेल्या 'अनन्या' नाटकाचं कथानक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या अभियनायाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून ऋताचं रूपेरी पडद्यावर पदार्पणही होत आहे. प्रताप फड हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

'अनन्या' सिनेमाचा मुहूर्त संपन्न

ड्रीमव्हिवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मेघना जाधव आणि सतीश जांभे हे सहनिर्माते आहेत. स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. "अनन्या" या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, वेगळ्या माध्यमात आणि वेगळ्या रूपात ही कथा येत आहे. एक आशयसंपन्न आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

ऋतासह या चित्रपटात आणखी कोण कलाकार आहेत असे बाकी सर्व तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या वर्षीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details