मुंबई -स्वमग्नता किंवा ऑटिझम या विषयावर फारसे बोलले जात नाही, पण एका मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीवर अशीच एक नायिका आपल्या भेटीला येत आहे. नावाप्रमाणे आनंदी असणाऱ्या एका गोड चिमुकलीची गोष्ट ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे.
२ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील मुख्य पात्र असलेली आनंदी ही स्वमग्न मुलगी आहे. आनंदीसारखी अनेक मुले आपल्या आजूबाजूला असतात. अशा मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दष्टीकोन वेगळा असतो. प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून या मुलांकडे पाहत असतो. निसर्गाने आनंदीकडे सुद्धा खासियत दिलेली आहे. सोनी मराठीवर आपल्या भेटीला येणाऱ्या आनंदीकडे असे काही अचाट गुण आहेत. आनंदीची गणित आणि आकडेमोडीची क्षमता अविश्वसनीय आहे.
हेही वाचा -मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यातील 'रुसवा फुगवा'