महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमृता धोंगडे व तेजस बर्वे यांच्याबरोबर माधुरी पवार दिसणार 'दिशाभूल' मध्ये! - मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्रीचे पुनरागमन

‘दिशाभूल’ (Dishabhul Marathi Movie) या चित्रपटात माधुरी पवारबरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि ‘फुलपाखरू’ फेम अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याचबरोबर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे, प्रणव रावराणे, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शुभम मांढरे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे अशी तगडी स्टारकास्टही दिसणार आहे.

amruta dhongade
amruta dhongade

By

Published : Jan 20, 2022, 12:39 PM IST

amruta dhongade

मुंबई -'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या टीव्ही मालिका यात काम करणारी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार आगामी 'दिशाभूल' या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या 'दिशाभूल' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला.

‘दिशाभूल’ या चित्रपटात माधुरी पवारबरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘फुलपाखरू’ फेम अभिनेता तेजस बर्वे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याचबरोबर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे, प्रणव रावराणे, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शुभम मांढरे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे अशी तगडी स्टारकास्टही दिसणार आहे. या चि6पटात तेजससह मुख्य भूमिकेतील दूसरा अभिनेता कोण? याची उत्कंठा आता प्रेक्षकांना लागली आहे.

दिशाभूल हा वेगळा प्रयोग
चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, “‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. तरुण कलाकारांना संधी देतानाच दिग्गज कलाकारांना आम्ही सोबत घेतले आहे. 'दिशाभूल' मधून आम्ही करत असलेला वेगळा प्रयोग प्रेक्षकांना भावेल असा विश्वास वाटतो.” दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर असा ट्रिपल धमाका असणार आहे. असल्याचे दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले.

वेगळ्या धाटणीची कथा
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना माधुरी म्हणाली, “'दिशाभूल' हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग सुरू झालं असून नवीन टीम सोबत काम करताना मजा येत आहे.” सानवी प्रॉडक्शन हाऊसच्या "दिशाभूल" चित्रपटाचा मुहूर्त निलेशजी राठोड (गृहमंत्रालय, नवी दिल्ली), रुकिया कडावत (राठोड) (बांधकाम व्यावसायिक), दशरथ गायकवाड (विस्तार अधिकारी) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक आशिष कैलास जैन, डीओपी वीरधवल पाटील, संगीतकार क्रिस मस्करेन्हस, प्रथमेश धोंगडे, विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, योगेश गोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा -आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर शाहरुख खान इन्स्टाग्रामवर पुन्हा सक्रिय

ABOUT THE AUTHOR

...view details