मुंबई- बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये आता आणखी एका नावाचा समावेश होत आहे. बॉलिवूडचे दिग्गज खलनायक अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी हा त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याच्या चित्रपटाचं मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.
बऱ्याच दिवसापासून वर्धन पुरीच्या बॉलिवूड एन्ट्रीच्या चर्चा सुरू होत्या. आता 'ये साली आशिकी', या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये वर्धनसोबत शिवालिका ओबेरॉय ही नवोदित अभिनेत्री देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे.
हेही वाचा -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिरंजीवीसोबत पाहिला 'सैरा'