चेन्नई - तामिळ, संस्कृत आणि तेलुगु या भाषेच्या तुलनेत हिंदी भाषा कमी वयाची असल्याचे विधान तामिळ अभिनेता आणि मक्कल निधी मायेम पक्षाचे नेते कमल हासन यांनी केलं आहे. अलिकडेच हिंदी भाषा दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर हासन यांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे.
हिंदी भाषा ही लंगोट घालणाऱ्या लहान बाळासारखी आहे. या भाषेची आम्ही काळजी घेऊ कारण हे आमचेच बाळ आहे. तामिळ , तेलुगु, संस्कृतच्या तुलनेत ही भाषा अजूनही कमी वयाची आहे, असे कमल हासन यांनी पुढे म्हटलंय.