अॅमी जॅक्सन झाली आई, पाहा तिच्या बाळाची पहिली झलक - ammy jackson relationship
अॅमीने प्रेग्नंसीदरम्यानही तिचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले. तिने तिचा प्रेग्नंसीचा काळ खूप एन्जॉय केला. विविध व्हिडिओ, फोटोशूटही तिनं शूट केलं होतं.
![अॅमी जॅक्सन झाली आई, पाहा तिच्या बाळाची पहिली झलक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4535186-thumbnail-3x2-ammy.jpg)
अॅमी जॅक्सन झाली आई, पाहा तिच्या बाळाची पहिली झलक
मुंबई - अभिनेत्री अॅमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीच्या बऱ्याच दिवसापासून चर्चा होत्या. बाळाच्या आगमनापूर्वी तिने आयोजित केलेलं 'बेबी शॉवर' खास चर्चेत राहिलं. अॅमी तिचा बॉयफ्रेन्ड जॉर्ज पानायियोतो याच्यासोबत बऱ्याच दिवसापासून रिलेशनशिपमध्ये आहे. एमीच्या प्रेग्नंसीनंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. आता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिनं तिच्या बाळाची छबीही सोशल मीडियावर शेअर केली आहे.