मुंबई - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे एक सुंदर पेंटिंग एका दिव्यांग चाहत्याने बनवले आहे. विशेष म्हणजे हे चित्र त्याने हाताने नाही तर पायाने बनवले आहे.
बिग बीच्या दिव्यांग फॅनने पायाने बनवले पेटिंग, फोटो व्हायरल - दिव्यांग फॅनने पायाने बनवले पेटिंग
अमिताभ बच्चन यांचा सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल झालाय. हा फोटो त्यांच्या एका दिव्यांग चाहत्याने आपल्या पायाने बनवला आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातील मिर्झाचे कॅरेक्टर या फोटोत रेखाटण्यात आले आहे.
बिग बीच्या दिव्यांग फॅनने पायाने बनवले पेटिंग
युवा कलाकार असलेल्या आयुषने हे चित्र बनवले आहे. 'गुलाबो सिताबो' मधील मिर्झा त्याने रेखाटला आहे. अमिताभ यांनी हे चित्र शेअर केले असून आयुषच्या या कलेचे कौतुक केले आहे. आयुष हातांचा वापर करु शकत नसल्यामुळे त्याने पायाने चित्र बनवले आहे. आयुषच्या या प्रतिभेला बच्चन यांनी आशिर्वाद दिला आहे.
हे चित्र पाहून अनेकांनी आयुषचे कौतुक केले आहे. बच्चन यांच्या सोशल मीडियावर अनेक सुंदर प्रतिक्रिया मिळत आहेत.