महाराष्ट्र

maharashtra

'बिग बीं'चे हे ट्विट विवेकसाठी तर नाही? वाचा काय म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका ट्विटचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी विवेकला सल्ला तर दिला नाही ना? अशा चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत.

By

Published : May 21, 2019, 10:14 AM IST

Published : May 21, 2019, 10:14 AM IST

'बिग बीं'चे हे ट्विट विवेकसाठी तर नाही? वाचा काय म्हणाले...

मुंबई -विवेक ओबेरॉयने ऐश्वर्याबाबत केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियामध्ये वनवा पेटला आहे. एक्झिट पोल संदर्भात त्याने ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबधीत एक मीम त्याच्या ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांसह सोशल मीडिया युजर्सनेही विवेकला धारेवर धरले. एवढेच नाही, तर राज्य महिला आयोगानेही या ट्विटची दखल घेत विवेकला नोटीस बजावली आहे. आता अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका ट्विटचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी विवेकला सल्ला तर दिला नाही ना? अशा चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत.

'बिग बीं'नी त्यांच्या ट्विटरवर लिहिले आहे, की 'सोशल मीडियावर व्यक्त होताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा. सोशल मीडियावर विचारपुर्वक व्यक्त व्हा'. ('Social मीडिया पर सोच समझ कर जिक्र करो, ए दोस्त कहीं सामाजिक ऐतबार से गैर मुनासिब ना हो'), असे ट्विट त्यांनी केले आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर बऱ्याच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'इशाऱ्यामध्ये अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटमधुन बरेच काही सांगितले आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही, की कोणीही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात दखल देईल', असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details