मुंबई -सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बरेच जण प्रसिद्ध झाले आहेत. हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे लपलेले गुण जगासमोर येतात. सध्या असाच एका डान्सरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या डान्सरने नेटकऱ्यांनाच नाही तर, महानायक अमिताभ बच्चनपासून हृतिक रोशनपर्यंत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांवर छाप पाडली आहे.
एका मुलाचा टिक-टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकुळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने केलेला डान्स भल्याभल्यांना थक्क करेल असा आहे. त्याचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असताना तो अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतही पोहोचला आहे. त्यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.