मुंबई - 'चांद्रयान २' मोहिमेच्या अंतिम टप्प्यात विक्रम लँडरचा संपर्क तुटला अन् सर्वांचीच निराशा झाली. मात्र, या अपयशाने न हारता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता 'चांद्रयान ३' साठी भरारी घेण्यासाठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासोबत इतरही बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रोच्या टीमचं कौतुक केलं आहे.
अक्षय कुमारने अलिकडेच 'मिशन मंगल' चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यामुळे एखादं मिशन पूर्ण करण्यासाठी इस्रोची टीम कशी काम करते, हे त्याने जवळून अनुभवले आहे. त्यामुळे 'जिथे प्रयोग नाही तिथे विज्ञान नाही. कधी कधी आपल्याला यश मिळतं, तर कधी आपल्याला प्रयोगातून शिकायला मिळतं. इस्रोच्या टीमला अभिवादन. 'चांद्रयान २' मोहिमेतूनच 'चांद्रयान ३' या मोहिमेची वाट मोकळी होईल', असे ट्विट अक्षयने केले आहे.
शाहरुख खान यानेही ट्विटमध्ये लिहिलंय की 'कधी कधी आपण आपल्या धैय्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र, आपण नक्की यशस्वी होऊ, या आशेवर विश्वास ठेवून पुन्हा नव्या उमेदीने काम करू. सध्याची स्थिती ही आपली अंतिम स्थिती नाही. आपली वेळ नक्की येईल. इस्रो आम्हाला तुमच्यावर गर्व आहे'.
हेही वाचा-लँडर विक्रम 'क्रॅश' झालेले नाही, ऑर्बिटर आणि लँडरदरम्यान संपर्क अद्यापही कायम - माजी इस्रो संचालक
अमिताभ बच्चन यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. तसंच
'तू ना थके गा कभी ,
तू ना मुड़े गा कभी , तू ना थमे गा कभी
कर शपथ कर शपथ कर शपथ
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ', असे ट्वीट करुन त्यांनी एक कविता शेअर केली आहे.
हेही वाचा-Chandrayaan 2: इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधानांनी केले सांत्वन
दिग्दर्शक करण जोहर यानेही इस्रोच्या टीमला अभिवादन केलं आहे.
अभिनेता फरहान अख्तर यानेही ट्विट केलं आहे.