मुंबई -बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी ते अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यासोबत वेळ घालवताना दिसले.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती.
अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासोबतच त्यांची मुलगी श्वेता बच्चनही यावेळी उपस्थित होती. तिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव... पाहा, बिग बींच्या गाजलेल्या ५० भूमिकांचा कोलाज