मुंबई - मराठी सिनेसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'झुंड' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना आतुरता आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. तर आता या चित्रपटाचा दमदार टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात बिग बींच्या आवाजाने सुरू होते. 'झुंड ना कहीये साहब टीम कहीये टीम', असा त्यांचा डायलॉग सुरुवातीलाच ऐकायला मिळतो. तसेच, काही मुलांच्या पाठमोऱ्या आकृत्याही या टीझरमध्ये पाहायला मिळतात.
हेही वाचा -'भूल भुलैय्या २'मध्ये दिसणार अक्षय कुमारच्या चित्रपटातील २ गाणी
नागराज मंजुळे याचा 'झुंड' चित्रपट हा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नागपूर येथे शूटिंग पूर्ण केले.