मुंबई -दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटाचा शेवटचा शॉट पूर्ण करण्यासाठी बिग बी रवाना झाले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करुन त्यांनी याबाबत माहिती दिली.
'झुंड'चा शेवटचा शॉट चित्रीत करण्यासाठी 'बिग बी' रवाना - रिंकू राजगुरू
'झुंड' हा चित्रपट खेळावर आधारित आहे. यामध्ये बिग बी हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे बरेचसे अपडेट्स त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
'झुंड' हा चित्रपट खेळावर आधारित आहे. यामध्ये बिग बी हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे बरेचसे अपडेट्स त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या चित्रपटाचा शेवटच्या शॉट ते पूर्ण करतील.
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी नागपूरमध्ये शूटिंग केलं.
या चित्रपटामध्ये 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे देखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.