महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना टाकले कोड्यात, शेअर केला ६२ वर्षांपूर्वीचा जुना फोटो - mahanayak

महानायक अमिताभ बच्चन यांचा वयाच्या ७८व्या वर्षीदेखील असलेला उत्साह भल्याभल्यांना मागे टाकतो. या वयातही तेवढ्याच उमेदीने चित्रपटात भूमिका साकारणारे बिग बी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात.

अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना टाकले कोड्यात, शेअर केला ६२ वर्षांपूर्वीचा जुना फोटो

By

Published : May 20, 2019, 2:57 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांचा वयाच्या ७८व्या वर्षीदेखील असलेला उत्साह भल्याभल्यांना मागे टाकतो. या वयातही तेवढ्याच उमेदीने चित्रपटात भूमिका साकारणारे बिग बी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात. नेहमी काही ना काही ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी त्यांचा तब्बल ६२ वर्षांपूर्वींचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोबद्दल काय सांगाल? तसेच यातला 'छोटा पतला डॉन' कोणता आहे, हे ओळखण्यास सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांचा हा फोटो १९५७ मधला आहे. शेरवुड कॉलेजमध्ये असताना मैदानावर आराम करतानाचा हा फोटो आहे. सगळे त्यावेळी फुटबॉल खेळत होतो, असे अमिताभ यांना या फोटोबाबत लिहिले आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ६२ वर्षांपूर्वीचा जुना फोटो
केवळ इतकेच नाही तर हा फोटो पाहून अमिताभ स्वत:च स्वत:ची मजा घेताना दिसले. 'लोग कहने लगे, पिक्चर छाप दी. बोलो कौन है कौन? नाडा जिसका दिखे, वही है छोटा पतला डॉन', असे त्यांनी लिहिले.

सध्या अमिताभ रूमी जाफरी यांच्या 'चेहरे' या चित्रपटात बिझी आहेत. अलीकडे या चित्रपटाचे फर्स्ट लूक समोर आले होते. इमरान हाश्मी यात मुख्य भूमिकेत आहेत. हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे. आलिया-रणबीर सोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातही ते झळकणार आहेत. तसेच, नागराज मंजुळे यांच्या 'झुंड'मध्येही ते दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details