महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याची 'बिग बीं'वर आजही भूरळ, स्वत:च केला खुलासा - जया बच्चन

बिग बींवर बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या सौंदर्याची आजही भूरळ आहे. अलिकडेच छोट्या पडद्यावरील रिअ‌ॅलिटी शो 'सुपरस्टार सिंगर' या कार्यक्रमात खुद्द अमिताभ बच्चन यांनीच याचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याची 'बिग बीं'वर आजही भूरळ, स्वत:च केला खुलासा

By

Published : Sep 6, 2019, 12:11 PM IST

मुंबई -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. मात्र, बिग बींवर बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या सौंदर्याची आजही भूरळ आहे. अलिकडेच छोट्या पडद्यावरील रिअ‌ॅलिटी शो 'सुपरस्टार सिंगर' या कार्यक्रमात खुद्द अमिताभ बच्चन यांनीच याचा खुलासा केला आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून वहिदा रेहमान या आहेत. अमिताभ बच्चन हे वहिदा रेहमान यांना त्यांचा आयडॉल मानतात. एवढंच नाही, तर त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करत त्यांनी वहिदा रेहमान यांचं भरभरुन कौतुकंही केलं. दरम्यान त्यांनी १९७१ सालचा एक किस्सा देखील शेअर केला.

जेव्हा ते 'रेशमा और शेरा' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. तेव्हा पहिल्यांदा वहिदा रेहमान यांना भेटले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन हे शूटिंगदरम्यान वहिदा यांच्याकडे चपलांचा जोड घेऊन गेले होते. कारण, चित्रपटाच्या एका सीनसाठी वहिदा रेहमान या गरम वाळूवर पाय ठेवून बसल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शकांनी ब्रेक दिल्यावर अमिताभ यांनी कोणताही वेळ वाया न घालवता त्यांना चप्पल नेऊन दिली होती. हा क्षण माझ्यासाठी खूप खास असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा-अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यानंतर 'अशी' होती विराटची प्रतिक्रिया

याशिवाय अमिताभ यांनी वहिदा रेहमान यांच्यासंदर्भातला एक मजेदार किस्सा देखील सांगितला. वहिदा यांनी बिग बिंच्या कुटुंबातील ३ सदस्यांसोबत काम केले आहे. ज्यामध्ये त्यांनी फक्त आईची भूमिका साकारली. 'फागुन' (१९७३) मध्ये वहिदा यांनी जया बच्चन यांच्यासोबत भूमिका साकारली. २००२ मध्ये 'ओम जय जगदीश' मध्ये अभिषेक बच्चनसोबत भूमिका साकारली. तर, १९७८ साली 'त्रिशूल' चित्रपटात माझ्यासोबत आईची भूमिका साकारली, असेही बिग बींनी सांगितले.

हेही वाचा-सिद्धार्थ-रितेशच्या 'मरजावां' चित्रपटाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details