महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बिंना डॉक्टरांची सक्त ताकिद, काय आहे प्रकरण? - big b completed 50 years in industry

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये अस्थिरता आली होती. त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं.

बिग बिंना डॉक्टरांची सक्त ताकिद, काय आहे प्रकरण?

By

Published : Nov 7, 2019, 11:35 PM IST

मुंबई -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीत नुकतेच ५० वर्षे पूर्ण केली आहेत. या ५० वर्षात त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि व्यक्तीमत्वाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या विविधांगी भूमिकांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, आता त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याची सक्त ताकिद दिली आहे. काही दिवस अभिनयातून विश्राम घेऊन आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच आपल्या अधिकृत ब्लॉगरवरुन माहिती दिली आहे. 'स्वर्गातून स्टेथोस्कोप घालून आलेल्या दुतांनी मला आराम करण्याची ताकिद तर दिली आहे, मात्र, तरीही मी काम सुरू ठेवेल, असे त्यांनी यामध्ये लिहिले आहे'.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये अस्थिरता आली होती. त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. सध्या ते छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती'च्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहेत.
अमिताभ बच्चन यांना याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये 'झुंड', 'चेहरे', 'गुलाबो' आणि 'ब्रम्हास्त्र' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details