मुंबई - थोर साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 'शत शत नमन' करीत त्यांना अभिवादन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी या थोर साहित्यिकाबद्दल आपला आदर व्यक्त केला आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त अमिताभ यांनी केले 'शत शत नमन' - महान साहित्यिक रविंद्रनाथ टागोर
थोर साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 'शत शत नमन' करीत त्यांना अभिवादन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी या थोर साहित्यिकाबद्दल आपला आदर व्यक्त केला आहे.
अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''रविंद्रनाथ टागोर यांची आज जयंती. कवी, लेखक, दर्शनशास्त्री, शिक्षण संस्थांचे संस्थापक, श्रेष्ठतेचे प्रतिक...राष्ट्रगीताचे लेखक...'शत शत नमन' ''
७ मे १८९१ रोजी आजच्या कलकत्त्यात जन्मलेल्या रविंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय होते, ज्यांनी नोबेल पुरस्कार जिंकला होता. १९१३मध्ये त्यांना हा महान पुरस्कार त्यांच्या साहित्य रचनेसाठी देण्यात आला होता. टागोर यांनी अनेक क्षेत्रात कामगिरी करीत भारताचे राष्ट्रगीताचे लेखनही केले होते.