मुंबई - सध्या देशभरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे नागरिकांना प्रचंड झळा सोसाव्या लागत आहेत. महाराष्ट्रासह इलाहाबाद, दिल्ली, जयपूर, लखनऊ, या शहरातही उन्हाचा पारा हा ४५ अंश सेल्सियसच्यावर पोहोचला आहे. या उन्हाच्या झळा महानायक अमिताभ बच्चन यांनाही पोहोचत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर मजेशीर ट्विट करून उन्हामुळे कसे हाल होत आहेत, हे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी त्यांचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे.