महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिग बींच्या मनात आली 'ही' शंका - Amitabh Bachchan latets news

अमिताभ बच्चन यांनी आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. वयाच्या ७७ व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आहेत.

Amitabh bachchan feelings after receiving Dadasaheb Phalke award
दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिग बिंच्या मनात आली 'ही' शंका

By

Published : Dec 29, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बिग बींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

'जेव्हा या पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. माझ्यासाठी हा इशारा आहे की काय, 'भाईसाहब आता तुम्ही खूप काम केले आहे. आता घरी बसून आराम करा. पण, अजूनही भरपूर काम बाकी आहे, जे मला पूर्ण करायचे आहे', असे अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले.

हेही वाचा -राष्ट्रपतींच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

अमिताभ बच्चन यांनी आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. वयाच्या ७७ व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आहेत. आगामी काळातही बऱ्याच चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत. यामध्ये 'ब्रम्हास्त्र', 'चेहरे', 'गुलाबो - सिताबो' आणि नागराज मंजुळे यांचा 'झुंड' या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा -'गुड न्यूज'ने वर्षाचा शेवट गोड, दुसऱ्या दिवशी कमाईत इतकी वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details