महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आईच्या पदराला कशाचीही सर नाही', बिग बी यांना 'या' गोष्टीमुळे आली आईची आठवण - amitabh bachchan upcoming films

अमिताभ बच्चन आईच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

Amitabh Bachchan emotional post memorizing his mother
'आईच्या पदराला कशाचीही सर नाही', बिग बींना 'या' गोष्टीमुळे आली आईची आठवण

By

Published : Jan 14, 2020, 7:36 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी व्यक्त होताना दिसतात. सध्या त्यांच्या प्रकृतीतही बरेच चढउतार येत आहेत. तरीही नव्या जोमाने कामाला लागून ते चाहत्यांना अपडेट्स देत असतात. अलिकडेच त्यांच्या एका फेसबुक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आपल्या आईच्या आठवणीत भावुक झालेल्या बिग बींनी त्यांच्या आईची एक आठवण शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले होते. 'उजवा डोळा फडकणं हे अशुभ असतं, असं लहानपणी ऐकलं होतं. डॉक्टरांकडे गेल्यावर हा काळा डाग असल्याचं लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की वयामुळे डोळ्यातील पांढरा भाग घासला जात आहे. त्यामुळे हा डाग तयार झाला आहे. लहान असताना आई तिच्या पदराचा गोळा बनवून त्यावर फुंकर मारून त्याला गरम करून डोळ्याला लावत असे. त्याप्रकारे करून पाहा, डोळा बरा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

आई तर नाही आता. त्यामुळे वीजेच्या सहाय्याने रूमाल गरम करून डोळ्याला लावला. त्याने फारसा काही फरक पडला नाही. आईचा पदर तो आईचा पदरच असतो. त्याला कशाचीही सर येत नाही', अशी पोस्ट लिहून बिग बी भावुक झाले.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

हेही वाचा -कैफी आझमी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त गुगलचं खास डूडल

अमिताभ बच्चन यांची आई तेजी यांचे २००७ साली डिसेंबर महिन्यात निधन झाले होते. आपल्या आईच्या आठवणीत त्यांनी लिहलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.

हेही वाचा -अमिताभ बच्चनपासून ते हृतिकपर्यंत सर्वांनाच 'या' डान्सरने लावले वेड, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details