मुंबई -मराठमोळी अभिनेत्री उषा जाधवला भारतीय आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ('ईफ्फी') मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'माय घाट: क्राईम नंबर १०३/२००५' या चित्रपटासाठी रौप्य मयुर पदकाची ती मानकरी ठरली. उषाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे.
उषाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत २०१४ साली 'भूतनाथ रिटर्न्स' या चित्रपटात भूमिका साकारली होती.
हेही वाचा -'मिनी मुव्ही मँनिया'मध्ये गोवा विभागात 'राँग' तर राष्ट्रीय विभागात 'अडगळ' ठरले विजेते