महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'इतिहास हमसे लिखा जाएगा'; 'बिग बी', चिरंजीवीची भूमिका असलेला 'सैरा'चा टीजर प्रदर्शित - राम चरण

अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार के सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे.

'बिग बी', चिरंजीवीची भूमिका असलेला 'सैरा'चा टीजर प्रदर्शित

By

Published : Aug 20, 2019, 4:53 PM IST

मुंबई -आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण यात दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांना एकाच चित्रपटात पाहण्याची अनोखी पर्वणी भारतीय सिने रसिकांना मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'सैरा नरसिंह रेड्डी' या चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक समोर आल्यानंतर आता टीजरही प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळते.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात या टीजरची सुरुवात होते. दमदार अॅक्शन सिन्स, भव्यदिव्य सेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे.

अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार के सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे.

सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत. २ ऑक्टोंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details