महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ यांनी मराठीत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा - Big B

अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विठ्ठल रखुमाईचे सुंदर फोटो शेअर करीत त्यांनी या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन

By

Published : Jul 12, 2019, 1:07 PM IST

Updated : Jul 12, 2019, 2:04 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सर्व स्तरातील प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. सर्व धर्माचे लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असतात. अमिताभही प्रत्येक सणावाराला चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरत नाहीत. आज त्यांनी वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विशेष म्हणजे अमिताभ यांनी या शुभेच्छा मराठीमध्ये दिल्या आहेत. त्यासोबत त्यांनी विठ्ठल रखुमाईची पाना-फुलात आणि सुंदर दागिण्यात मांडण्यात आलेल्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत.

आज संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सण उत्साहात पार पडतो आहे. गेले काही दिवस पंढरपूरच्या दिशेने चालत असलेले वारकरी आणि संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या. लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीत दाखल झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक सेलेब्रिटींनी आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात अमिताभ यांची मराठीत लिहिलेली पोस्ट आकर्षक आहे.

Last Updated : Jul 12, 2019, 2:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details