VIDEO: 'बिग बी' बनले रॅपर, 'बदला'साठी गायलं खास गाणं - सुनिर खेत्रपाल
तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'बदला' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अलिकडेच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. आता या चित्रपटातील दुसरं गाणं 'औकात' हेदेखील रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे एक रॅप गाणं आहे. अमिताभ बच्चन यांनीच हे रॅप गायलं आहे.
मुंबई - तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'बदला' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अलिकडेच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. आता या चित्रपटातील दुसरं गाणं 'औकात' हेदेखील रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे एक रॅप गाणं आहे. अमिताभ बच्चन यांनीच हे रॅप गायलं आहे.
या गाण्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात बिग बींचा रॅपरमधील अंदाज पाहायला मिळतो. यापूर्वी तापसी पन्नुवर चित्रीत झालेले 'क्यो रब्बा' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. हे गाणे अरमान मलिकने गायले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर भरभरुन लाईक्स मिळाले. आता बिग बींच्या रॅप गाण्यालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.