मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. कलाकार आणि खेळाडूंनंतर आता राजकीय नेत्यांवरही आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात ठाकरे आणि द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पीएम मोदी असे या बायोपिकचे शीर्षक असणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. आता यापाठोपाठ चित्रपटाचे दुसरे पोस्टर अमित शाह यांच्या उपस्थितीत लाँच केले जाणार आहे.