मुंबई -बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच महिन्यात अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार होता. त्यामुळे आमिर खानच्या विनंतीवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
होय, 'बच्चन पांडे' आणि 'लाल सिंग चढ्ढा' हे दोन्ही चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. मात्र, एकाच दिवशी दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले तर त्याचा दोन्ही चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आमिर खानने 'बच्चन पांडे' चित्रपटाचे निर्माते आणि अक्षय कुमार यांच्याशी संवाद साधुन 'बच्चन पांडे' या चित्रपटाची तारीख बदलण्याची विनंती केली.
हेही वाचा -ग्रॅमी अवार्ड्स २०२० : लेडी गागा, बेयॉन्से यांची पुरस्कारावर मोहोर; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी